लोणंद केमिस्ट असोसिएशन तर्फे आय सी यु बेड चे लोकार्पण सोहळा

लोणंद केमिस्ट असोसिएशन तर्फे आय सी यु बेड चे लोकार्पण सोहळा

” *लोणंद केमिस्ट असोसिएशन तर्फे आय सी यु बेड चे लोकार्पण सोहळा संपन्न

 

लोणंद प्रतिनिधी”* केमिस्ट हृदय सम्राट , ऑल इंडीया ऑरगनाइझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ इंडीया चे सन्मानिय अध्यक्ष मा .आ . जगन्नाथ शिदे उर्फ आप्पासाहेब यांच्या अमृत मोहत्सवी वाढदिवसानिमित्त लोणंद केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गरजु नागरीकां करीता आयसीयु बेड चे लोकार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार शशीकांत जाधव होते . लोणंद नगरीतील गरजु रुग्णांची आवश्यकता पाहता ज्यांना २ -३ महीने आयसीयु बेड ची गरज असते परंतु ते विकत घेऊन वापरणे परवडत नाही . अश्या अंथरुणास खिळुन राहीलेल्या रुग्णाना लवकर बरे करता येणे साठी आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद केमिस्ट असोसिएशन तर्फे आयसीयु बेड रुग्णा करीता अत्यल्प दरात उपलब्ध करण्यात आला आहे . या प्रसंगी श्री जाविद पटेल यांनी प्रस्तावना केली . बेडची आवश्यकता समजावुन सांगितली तसेच सन्मानिय आप्पासाहेबां चे कार्य विषद केले . यावेळी जेष्ठ मार्गदर्शक धनंजय घोडके यांनी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शशीकांत जाधव यांनी सदरील कार्याचे कौतुक केले . केमिस्ट असोसिएशन नेहमीच सामाजिक कार्य करत असते . यापुढील त्यांचे कार्य आम्ही पत्रकार बांधव निश्चितपणे समाजापुढे मांडू याची ग्वाही दिली . वृक्षारोपण का केले पाहीजे या बद्दल मार्गदर्शन केले . आप्पा साहेबांच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच त्यांना अमृत मोहत्सवी वाढदिना बद्दल शुभेच्छा दिल्या . लोणंद केमिस्ट असो चे अध्यक्ष सारंग जाधव यांनी आभार मानले . कार्यक्रमा नंतर अल्पो उपहार व आप्पासाहेबांच्या वाढदिवसा निमित्त केक कापण्यात आला . तदनंतर आयसीयु बेडचे उदघाटन वजा लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या संपूर्ण कार्यक्रमात सर्व केमिस्ट बांधवानी सहभाग घेतला . कार्यक्रम यशस्वी करण्या करीता अजित भोईटे ‘धनंजय घोडके ,सारंग जाधव ‘ जाविद पटेल,गणेश देशमुख , प्रसन्ना शहा, नितिन बहीरट आनंदा पाडळे, नवनाथ साळुंखे तुषार बुनगे सत्यजीत खताळ ‘ रवी शहा संतोष सस्ते ‘ राजु धायगुडे , महेश यादव , अमोल जगताप आदी नी विशेष परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *