पैशाच्या पाऊसात अनेकजण भिजले, आता तक्रारीचा पडणार पाऊस
म्हसवड दि. १२ महेश कांबळे )
सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ही अंधश्रध्देने आपली पाळेमुळे समाजात किती खोलवर रोवली आहेत याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत भोंदु बाबाने पाडलेला पैशाचा पाऊस, या पैशाच्या पाऊसात अनेकजण भिजले असले तरी जो – तो गप्प आहे आधी कोण पुढे येतोय यावर एक एक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता असुन या पैशाच्या हव्यासापोटी माण तालुक्यातील अनेकजण गुंतले असुन पोलीसांनी या प्रकरणी फसवणुक झालेल्यांना दिलासा दिल्यास भोंदु बाबा च्या विरोधात तक्रारीचाही पाऊस नक्की पडणार आहे.
पैशाच्या पाऊसाचे आमिष माण तालुक्यातील अनेकांना दाखवले गेले असुन आजवर अनेकजणांची या मध्ये फसवणुक झालेली आहे, या मध्ये ज्यांची फसवणुक झाली आहे ते काही अडाणी अथवा निरक्षर नाहीत तर शिक्षीत, श्रीमंत लोकं आहेत. गरीब लोकं अशा भानगडीतच पड़त नाहीत त्यांच्याकडे पैसाच नसल्याने असले बाबा त्यांना भेटतही नाहीत, मात्र माण तालुक्यातील या पैशाच्या पाऊसात अनेकजण नक्कीच भिजले असुन म्हसवड पासुन ते गोंदवले पर्यत याची पाळेमुळे रोवली गेली असल्याची चर्चा आहे. अनेकजण आपली फसवणुक झाली असल्याचे सांगण्यास धजावत आहेत, आपले नाव जर सर्वांना कळले तर आपले अज्ञान व आपली पैशापोटीचा हव्यास इतरांना समजेल म्हणुन अनेकजण नशीबाला दोष देत गप्प बसले आहे, यमध्ये अनेक शासकीय सेवेतील व्यक्ती व काही सोने चांदीचे व्यापारी यांचा समावेश असल्याने प्रत्येकाने मौन बाळगले असले तरी म्हसवड पोलीसांनी आरोपींचा ज्या प्रमाणे शोध सुरु केला आहे त्याप्रमाणेच फसवणुक झालेल्या लोकांचाही शोध घेवुन त्यांना विश्वासतात घेतल्यास पैशाच्या पाऊसाप्रमाणेच तक्रारींचाही पाऊस निश्चित पडेल एवढे मात्र नक्की.