संभाजी राजे ग्रुपच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न महिलांचा उत्स्फूर्त सहभाग..
मुरूम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती संभाजी राजे ग्रुप चे सचिन पाटील शिंदे पाटील यांच्यातर्फे शनिवारी (ता. २५) रोजी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सदस्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. यावेळी मयुरी चौधरी, रूपाली शिंदे, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरकते प्रसाद मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन उत्साहात कार्यक्रम पार पडला. संभाजी नगर येथे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करणारे सचिन शिंदे हे कौतुकास्पद कार्य करत असल्याचे यावेळी प्रसाद मोटे यांनी म्हटले. छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे आकाश शिंदे, रतन मुडे, मोन्या राजपूत, बापू जाधव, सुमित शेळके, मल्लू तडकले, अक्षय शिंदे, सतीश मुदकन्ना, वैभव शिंदे, अभिजीत सूर्यवंशी, सुमित शिंदे, भैय्या धर्माधिकारी, सुमित पांढरे, सागर शिंदे, बंटी राजपूत, भरत घोडके, जिगर पवार, शिवराज गिरीबा, विकास शिंदे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मयुरी चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती महामुनी तर आभार शहाजी भोसले यांनी मानले.