रुग्णसेवक शुभम पाटील यांना युवारत्न पुरस्का
तासगांव:
तासगाव तालुक्यातील येळावी गावचे सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील यांना प्रतिष्ठा फाउंडेशन यांचे वतीने युवारत्न पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा तासगांव येथे नुकताच संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.कुलगुरू डॉ.प्रा.माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.रणधीर शिंदे, प्रदीप काका पाटील यांसोबत मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते.शुभम पाटील हे संत निरंकारी मिशन चे अनुयायी असून सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या शिकवनीतून आध्यात्मिक जागृती बरोबर समाजाप्रती सेवेची भावना त्यांच्या मध्ये जागृत झाली.
शुभम पाटील हे रक्तदान शिबीर, वृद्धाआश्रम सेवा, स्वच्छता अभियान,अध्यात्मिक जागृती असे उपक्रम राबवत असतात. परिसरातील लोकांना रक्ताची गरज लागल्यास ते मोफत रक्तपुरवठा करतात, आतापर्यंत त्यांनी 300 पेक्षा जास्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला आहे. यावेळी ते, म्हणाले हा पुरस्कार मला मिळाला नसून मला समाजकार्य करताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा हा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.