स्व. संभाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
औंध : दि. 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संचलित प्राथमिक माध्यमिक आणि आणि स्वर्गीय संभाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालया मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी ध्वजपुजन मा.श्री.डॉ.विलास साळुंखे आणि ध्वजारोहण मा.मेजर दादासाहेब घार्गे यांच्या हस्ते करणेत आले .
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा.श्री. रमेश चव्हाण साहेब (व्यवस्थापक ज्योती गॅस,एजन्सी) यांचे मार्फत पिठाची गिरण (14″)(3HP) शाळेस सप्रेम भेट देणेत आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ देशमुख (बापू), आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मा.जयसिंगराव घार्गे साहेब,मेजर शेवडे मा.अमर देशमुख (उद्योजक),मा.सह्याद्री देशमुख, मा.वसंत पवार (ग्रा.सदस्य),मा. संदीप इंगळे (काका),मा.दत्ता फडतरे, मा.नामदेव भोसले, मेजर संभाजी कुंभार, मा. साहेबराव देशमुख ,मा.महेश गोसावी,मा.अवधूत पछाडे,मा.केशव इंगळे, मा.बाजीराव आमले सर्व संचालक मंडळ, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते .