सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने २५% राखीव जागांसाठी आरटीईच्या प्रवेशाला येत्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ या वर्षासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिक (स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर महाराष्ट्र शासनाने प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया मंगळवार दि.१४/०१/२०२५ पासून सुरु केलेली आहे. यासाठी
आरटीई कायदयानुसार दुर्बल, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर प्रवेशासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावयाची आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून मंगळवारपासून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी शेवटची मुदत २७ जानेवारीपर्यंत आहे याची पालकांनी नोंद घ्यावी . ‘या’ प्रवेशासाठी वंचित घटकांतील बालके,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ),भटक्या जाती (ब, क, ड),इतर मागासवर्ग (ओबीसी)
विशेष मागासवर्ग (एसबीसी)
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक,एचआयव्ही बाधित किंवा एआयव्ही प्रभावित बालके,
अनाथ बालके,दिव्यांग बालके, हे या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात या संस्थेमार्फत शालेय प्रवेशा संदर्भात मोफत मार्गदर्शन व आॉनलाईन फॉर्म भरण्याच्या संदर्भात मोफत सल्ला पण दिला जाणार आहे याचा पालकांनी लाभ घ्यावा.तरी इच्छुक पालकांनी
१) श्री शशिकांत (बापू) कांबळे (संस्थापक,अध्यक्ष) ९८५०५६६००७, २) ॲड शिवाजी कांबळे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)९९२२२४६१२३ या फोन नंबर वर संपर्क करावा व कागदपत्रांसह समक्ष भेटावे असे जाहीर आवाहन समिती तर्फे करण्यात येत आहे.