विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांकडून कुरवली गावात स्वच्छता व जनजागृती
कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबीराचे आयोजन मौजे-कुरवली, ता.इंदापूर या ठिकाणी दिनांक १९ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले होते.या काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ७५ स्वयंसेवकांकडून गावातील शाळा,बँका, दवाखाने,मंदिरे,स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली,तसेच शिबिर कालावधीत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये प्रामुख्याने दुपारच्या सत्रात मा.सुनील गोडसे,डॉ.सचिन गाडेकर,डॉ.सिद्धार्थ सोरटे, प्रा.सागर देवकर,डॉ.किशोरी ताकवले या मान्यवरांचे व्याख्यान पार पडले.तर सायंकाळच्या सत्रात गावकरी व स्वयंसेवकांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, प्रा.डॉ.सुधीर इंगळे,प्रा.डॉ.श्रीराम गडकर,प्रा.कपिल कांबळे,यांनी मनोरंजनातून समाज प्रबोधन केले.
सदर शिबीर कालावधीत विविध उपक्रम हाती घेण्यात आले त्यामध्ये माझी वसुंधरा,डिजिटल साक्षरता,समर्थ भारत-समर्थ युवा,माती व पाणी परीक्षण,महिला सबलीकरण,वृक्षारोपण, गावातील महिलांसाठी हळदी कुंकू आणि स्मार्ट सूनबाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे निवेदन प्रा .कपिल कांबळे यांनी केले. अशा प्रकारे विविध उपक्रम राबवण्यात आले.
सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी शुभेच्छा दिल्या,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय केसकर व उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी मार्गदर्शन केले.कुरवली गावचे सरपंच मा.राहुल चव्हाण तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले,रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे व प्रा.सुवर्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.कपिल कांबळे,प्रा.रवी गायकवाड,प्रा.नितीन गोरे,प्रा.अमर वाघमोडे,प्रा.तेजश्री जाधव,प्रा.प्राजक्ता सोनवणे,प्रा.विद्या गुळीग, प्रा.नम्रता सपकळ,प्रा.सचिन आरडे,श्री.बाळासाहेब कवळे श्री.सुभाष भंडलकर,श्री.रघुनाथ लोहार महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.