मुरूम शहरात छावा चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी भरगच्च गर्दी…. छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पाहण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद…
मुरूम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा चित्रपट स्क्रीनिंगद्वारे बुधवारी (ता. २६) रोजी मोठ्या उत्साहात दाखविण्यात आला. सचिन शिंदे (पाटील) यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी राजे ग्रुपने छावा चित्रपट संभाजी नगर येथे प्रदर्शित केला. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटाचे प्रदर्शन सायंकाळी साडेसात वाजता सुरू झाले. शहरातील व संभाजी नगरच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दर्शविला. या स्क्रीनिंगला विशेषत: वृद्ध महिला, पुरुष आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम डिजिटल स्क्रीन आणि साऊंड सिस्टिमच्या सहाय्याने अत्यंत प्रभावीपणे नियोजन करण्यात आले होते. ज्यामुळे उपस्थितांना एक अनोखा अनुभव मिळाला. याप्रसंगी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, डॉ. आप्पासाहेब सुरवंशी, प्रकाश रोडगे, संतोष मुरूमकर, राजकुमार काकडे, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, सुरज शिंदे, आप्पासाहेब पाटील, प्रकाश कंटेकुरे, कल्लू येवले, संतोष पाताळे, सतिश मुदकन्ना, देविदास नागणे, श्रीमंत शिंदे, गोपाळ शिंदे, बब्रुवान जाधव आणि अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन शिंदे व छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे सदस्य आकाश शिंदे, आकाश जगदाळे, गणेश शिंदे, वैभव शिंदे, सुमित शिंदे, गोविंद जगदाळे, मल्लू तडकले, उत्तम शिंदे, राहुल आहेर, सुमित शेळके, रामजी खंडागळे, विकास शिंदे, सुनिल जाधव, आनंद सुरवसे, सागर शिंदे, पप्पू शिंदे, शहाजी भोसले आदींनी पुढाकार घेतला. फोटो
ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संभाजीनगरात छावा चित्रपटाप्रसंगी संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना उपस्थित मान्यवर व अन्य.