म्हसवड चे सपोनि अक्षय सोनवणे यांचे समोर नवं आव्हान
…
म्हसवड (वार्ताहर)—
…..
म्हसवड येथे नव्याने हजार झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनचे नवे कारभारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
अक्षय सोनवणे यांनी दहीवडी येथे उत्तम कामगिरी केली आहे.
यामुळे म्हसवड शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, मात्र म्हसवड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना नक्कीच कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
म्हसवड येथे अनेक नामवंत अधिकाऱ्यांनी म्हसवड पोलीस स्टेशनचे नाव उज्ज्वल केले होते.
आता म्हसवड शहरातील गुन्हेगार व वाळू माफिया डॉन यांना चाप घालण्यासाठी अधिक सक्षम अधिकारी हवा होता.
सातारा सोलापूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या म्हसवड शहरात वाढलेल्या शहरीकरणामुळे चोरी,व गुन्हेगारी वाढली आहे
वाळू माफिया व अवैध व्यवसाय करणाऱ्या व्हाइट कॉलर गुंडाची मंत्रालयापर्यंत पोहच आहे, यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी शक्यता दुरावली आहे, ट्राफीक ची दुरावस्था झाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या धुम स्टाईल मोटार सायकली व कॉलेज व शाळा परिसरातील रोड रोमिओ यांना जरब उतरलेली नाही.
बेकायदा अवैध वाहतूक व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने रस्त्यावर वाहणं लाऊन बिनदिक्कत रस्ता अडवतात, वाळू माफिया चे राज्य सुरू असून अवैध मटका जुगार व्यवसायिक गडगंज श्रीमंत झाले आहेत.
यांचीच पोलीस ठाण्यात वर्दळ वाढली आहे.
डॉल्बी मुळे शहरात लोक हैराण झाले आहेत. अवैध दारू विक्री जोरदार सुरू आहे.
अशा अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी सपोनि अक्षय सोनवणे यांना अधिक कठोर पावले उचलावी लागतील हे नक्की…
….
म्हसवड चे सपोनि अक्षय सोनवणे यांचे समोर नवं आव्हान
