शेतकऱ्याच्या पिकाची बदनामी यापुढे सहन करणार नाही – सलीम बागवान

शेतकऱ्याच्या पिकाची बदनामी यापुढे सहन करणार नाही – सलीम बागवान

(अजित जगताप)

सातारा

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून उत्पादन केलेल्या पीक, फळबाग व दुग्ध व्यवसाय यामुळे अनेकांची उपजीविका अवलंबून असते. असे असताना काही प्रसारमाध्यमातील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले चुकीची माहिती पसरवत आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या पिकाची बदनामी सहन करणार नाही. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे सातारा तालुका अध्यक्ष सलीम बागवान यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

माध्यमाच्या बदलत्या क्रांतीमुळे अनेक माहिती मिळत आहे. ही चांगली बाब असली तरी त्याचा वाईट परिणाम सुद्धा जलद गतीने होत आहे. एखादी सत्य बातमी समजण्यासाठी विलंब लागतो. परंतु, झटपट बातम्या च्या नादामुळे अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण ज्यांना शेती बद्दल कोणतीही माहिती नाही अशी काही मंडळी पराचा कावळा करून शेतकऱ्यांना उध्वस्त करू लागलेले आहेत. ही चिंचेची बाब आहे.

सध्या शीतपेयाच्या मोठमोठ्या कंपन्या जगभर पसरलेले आहेत. या उलट ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याच्या गारव्यासाठी अनेक जण कलिंगड विकत घेत असल्यामुळे परकीय शीतपेया धंद्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्याचे नगदी पीक असलेल्या द्राक्ष ,केळी, टरबूज, सफरचंद कलिंगडा बाबत अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचे उत्पादन हे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा विविध जिल्ह्यातून निघते. हेच कलिंगड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी वर्ग व फळ विक्रेते विशेष प्रयत्न करीत आहेत. सध्या कलिंगडावर औषध फवारणी व इंजेक्शन मारले जाते. अशी अफवा पसरवली जात आहे.
द्राक्ष, आंबे , टरबूज, राम फळ, केळी, सफरचंद , पपई अशी फळ आरोग्याला चांगली आहेत. परंतु याबाबत औषध फवारणी व इंजेक्शन देऊन ती पिकवली जातात. हे चुकीचे असून असा कोणताही खानदानी शेतकरी काम करत नाही. असेही कलिंगड विक्रेते बागवान यांनी सांगितले.
रमजान व होळीचा महिना असताना कोणीही अशा पद्धतीने अफवेवर विश्वास ठेवू नये. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कुणाची तीव्रता वाढल्यामुळे सातारा शहरातील करंजे परिसरात असलेल्या किर्दत पार्क समोर सध्या एस.पी.आर. फ्रुट स्टॉल मधून दिवसाला पाचशे ते सहाशे कलिंगडाची विक्री होते .अशी ही माहिती त्यांनी दिली.

कोणत्याही स्वरूपाचे वैज्ञानिक परीक्षण व तपासणी न करता फळांबाबत बदनामी केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे नेते दीपक भाऊ निकाळजे व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याची वेळ आणू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

———
फोटो- सातारा शहरात कडक उन्हाळ्यात गारवा देणाऱ्या कलिंगडाची खरेदी करताना ग्राहक वर्ग (छाया- अजित जगताप ,सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *