म.फुले शाळेच्या बालचमु नी घेतलाकृषी पर्यटनाचा आनंद

म.फुले शाळेच्या बालचमु नी घेतलाकृषी पर्यटनाचा आनंद


वडूज, (प्रतिनिधी-विनोद लोहार)
येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या बाल चमूनी आपलं गाव येथील कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन कृषी पर्यटनाचा आनंद घेतला.
या सहलीत शाळेतील लहान,मोठा , प्राथमिक मुले व पालकांनी सहभाग घेतला.यावेळी रेन डान्स, विविध आनंददायी खेळ,बैलगाडी सफर,जादूचे खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा मुलांनी सादर केले.मुलांना पाण्यात, झाडांभोवती खेळायला,बागडायला मिळाले.तसेच पालकांनी त्यांच्या मुलांबरोबरच शिक्षकांसह कृषी भोजनाचा मनमुराद आनंद घेतला.सर्वात महत्वाचे म्हणजे पालक व शिक्षकांनी विना मोबाईल दिवस सहलीचा आनंद घेतला. अतिशय उत्तम नियोजन करून स्वतःच्या पाल्यासोबत महिला पालक या सहलीत सहभागी झाले होते.त्यामुळे सहलीत मुले,पालक व शिक्षक यांचे चेहऱ्या वर वेगळाच आनंद दिसत होता.
सहल उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी संस्था संचालक,मुख्याध्यापिका शीतल शिंदे,बालवाडी शिक्षिका सुवर्ण लोहार,मनीषा खाडे,शिवानी पवार व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *