स्काऊट व गाईड नेतृत्व विकासाची पहिली पायरी…. संताराम पवार

स्काऊट व गाईड नेतृत्व विकासाची पहिली पायरी…. संताराम पवार

स्काऊट व गाईड नेतृत्व विकासाची पहिली पायरी…. संताराम पवार

म्हसवड..प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्काऊट अँड गाईड ही नेतृत्व , कौशल्य व विकासाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन स्काऊट मास्टर संताराम पवार यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे स्काऊट अँड गाईड बाबत मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता.. अध्यक्षस्थानी संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर होत्या. तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून स्काऊट मास्टर संताराम पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना संताराम पवार म्हणाले शालेय जीवनात सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी स्काऊट गाईडचे योगदान महत्त्वाचे आहे. या उपक्रमातूनच देशभक्त, व जबाबदार नागरिक घडविला जातो. स्वयंशिस्त, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, सहकार्याची भावना, स्वावलंबन, नेतृत्व विकास व कौशल्य विकास इत्यादीची जडणघडण स्काऊट गाईड च्या माध्यमातून होत असल्याचे पवार यांनी तपशीलवार सांगितले. देश बलवान करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदर्श नागरिक घडवणे , मूल्यशिक्षण देणे इत्यादी बाबत चे मार्गदर्शन पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले. शारीरिक,बौद्धिक घटनांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडवणे बाबत मार्गदर्शन केले. पपेट शो, गाण्यांच्या तालावरील नाच, टाळ्या वाजवण्याचे प्रकार या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचे काम संताराम पवार यांनी केले. पवार यांच्या मार्गदर्शनात क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थी सक्रिय सहभागी झाले होते. क्रांतिवीर शाळेतील उपक्रमशीलता व गुणवत्ता याबाबत संताराम पवार यांनी समाधान व्यक्त करून शाळेला उज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट केले.
मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून क्रांतिवीर शाळेतील उपक्रम तसेच सुयोग्य व्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली . सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षक तुकाराम घाडगे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *