म्हसवड (वार्ताहर )
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या 68 व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा दिनांक 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन मध्य प्रदेश सरकारचे शालेय शिक्षण मंत्री उदय प्रताप सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले आनंदाची वार्ता म्हणजे या स्पर्धेमध्ये मेरी माता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथील इयत्ता 8 वी मधील आर्यन मनोजकुमार कुंभार याने ओपन साईट रायफल प्रकारात 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक मिळवले. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत आर्यनने सुवर्णपदक पटकावले होते त्याचे मिळवलेले हे यश उत्तुंग असे असून त्याने म्हसवड परिसरासह सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवले त्याचे या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू सर्व पत्रकार मित्र व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.