सातारा जिल्ह्यात युवा सेना पदाधिकारी निवडीची गुढी उभारणार – रणजितसिंह भोसले

सातारा जिल्ह्यात युवा सेना पदाधिकारी निवडीची गुढी उभारणार – रणजितसिंह भोसले

सातारा जिल्ह्यात युवा सेना पदाधिकारी निवडीची गुढी उभारणार – रणजितसिंह भोसले

(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी सातारा म्हणजे महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात युवासेना पदाधिकारी निवडीची गुढी उभारणार असल्याची माहिती युवासेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसह भोसले यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना अधिक व्यापक प्रमाणात व्यासपीठ निर्माण करावे. हा त्यामागे उद्देश आहे. महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक कामे वेगाने होत आहेत. वरिष्ठ नेत्यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन यामुळे भविष्यात हेच युवक भारत देश व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे. यासाठीच सातारा जिल्ह्यातील युवा सेनेत सक्रिय सदस्यत्व घेऊन काम करण्यास उत्सुक असलेल्या युवकांसाठी लवकरच पद देऊन गुढी उभारण्यात येणार आहे. यामुळे खेड्यापाड्यातील युवकांना सुद्धा काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
युवा सेना सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये युवकांची फौज निर्माण केलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे व पक्षनेते एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे व सचिव किरण साळी, युवा नेते यशराज देसाई यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग नोंदवण्याची ही प्रक्रिया आहे. इच्छुक सातारा जिल्ह्यातील युवकांनी

(90 11 11 11 26).

९०१११११११२६

या क्रमांकावर संपर्क साधावा.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद गट उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, पंचायत समिती गण विभाग प्रमुख व प्रत्येक मोठ्या शहरासाठी शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसभा चिटणीस या पदासाठी युवकांना शिवसेना युवा सेनेची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही युवक पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचाही अवलोकन करून त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मिळाले असल्यामुळे या रिक्त पदावर उत्साही व काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना संधी दिली जाणार आहे. यासाठी सर्व हिंदुत्ववादी विचारसरणी तसेच समाजात कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या युवकांनी युवा सेना जिल्हाप्रमुख रणजीत सिंह भोसले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

_________________________________
फोटो सातारा जिल्हा शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *