डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

– सेलु येथे पुरस्कार वितरण सोहळा..

पुणे/प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येत्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे.असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार व परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना यथोचित सन्मान करून राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविले जाते. या वर्षी देखील परभणी जिल्ह्यातल्या सेलू या तालुका ठिकाणच्या शहरामध्ये हा भव्य सोहळा येत्या एक १ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री.एस.एम. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भेट देऊन सेलु पत्रकार संघाची बैठक घेत पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीसाठी आम्ही स्वतः उपस्थित होतो. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळावा फक्त एक दिवसाचा असणार आहे. राज्यभरातुन मुक्कामी येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या निवासस्थानाची व भोजनाची व्यवस्था सेलु तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेली ही डिजिटल मिडिया परिषद आहे. महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी व सदस्यांनी या मेळाव्यात सहभागी होणे बंधनकारक आहे. डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे,उपाध्यक्ष
अनिल उंबरकर, प्रदेश सदस्य अनिल धुपदाळे कोल्हापूर ,प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाठ बीड मराठवाडा,प्रदेश सदस्य तानाजी जाधव सांगली, प्रदेश सदस्य मल्हार पवार कर्जत रायगड, प्रदेश सदस्य शेख अफताब अहिल्याबाईनगर या सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी जबाबदारी घ्यावी.आपणास व इतर पदाधिकारी यांचे काही म्हणणे असल्यास आम्हाला संपर्क साधावा असे आवाहनही डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *