देवापुर – पळसावडे सोसायटीच्या चेअरमन् पदी मधुकर कांबळे, व्हा. चेअरमन् पदी बबन जाधव

देवापुर – पळसावडे सोसायटीच्या चेअरमन् पदी मधुकर कांबळे, व्हा. चेअरमन् पदी बबन जाधव

म्हसवड (महेश कांबळे)
माण तालुका भोई समाजाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त शिक्षक मधुकर बाबुराव कांबळे ( गुरुजी ) यांची देवापुर पळसावडे वि.वि.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन् पदी तर व्हा. चेअरमनपदी बबन एकनाथ जाधव यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
माण तालुक्यातील एक अग्रगण्य वि.का.स. सोसायटी म्हणुन ओळखल्या जाणार्या सदर सोसायटी ची वार्षिक उलाढाल ही ९ कोटीहुन अधिक आहे, ८८२ सभासद संख्या असलेल्या सदर सोसायटीची देवापुर येथे स्वमालकीची इमारत असुन सभासदांचे हित जोपासणारी संस्था म्हणुन मोठा नाव लौकिक आहे. १९६० साली स्थापन झालेल्या सदर सोसायटी ने आजवर सभासदांना लाभांश देणारी एकमेव सोसायटी ठरली आहे.
सन २०१२/१३ व १३/१४ या काळात मधुकर कांबळे हे सदर सोसायटी च्या चेअरमन् पदी असताना संस्थेस ३६ लाख रुपयाचा नफा मिळवुन देण्याबरोबरच सभासदांना १० टक्के लांभाश देण्याचे महत्वाचे कार्य कांबळे यांनी केले होते, त्यांच्या याच कार्याची दखल घेत सभासदांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची सोसायटीच्या चेअरमन् पदी बिनविरोध फेर निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल देवापुर, पळसावडे व भोई समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया –
सोसायटी सभासदांना फेर लाभांश वाटप करणार –
चेअरमन् मधुकर कांबळे –
सोसायटी च्या सभासदांनी आपणावर विश्वास दाखवत आपली सदर सोसायटी च्या चेअरमन् पदी बिनविरोध निवड केली असल्याने आपण यापुर्वी सदर सोसायटी नफ्यात ज्याप्रमाणे आणुन सभासदांना लाभांश देण्याचे काम केले होते त्याप्रमाणेच यंदाही काम करुन सभासदांना लाभांश देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नव निर्वाचित चेअरमन् मधुकर कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

फोटो –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *