पिपोडे बुद्रुक/प्रतिनिधी /अभिजीत लेभे
वाघोली ता.कोरेगाव येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून अंगणवाडी मुलांना शालेय साहित्याचे (स्पोर्ट ड्रेस) तसेच विद्यार्थ्यांना चषकाचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमामुळे मुलांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मकता निर्माण झाली असून त्यांना प्रोत्साहन मिळेल असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले या वेळी वाघोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अमिता अशोक भोईटे, उपसरपंच सौ प्रिया लाहिगुडे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते
संस्थेची कार्यक्षमता आणि उद्देशः
लोकराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही आरोग्य, कृषी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. गावातील सार्वजनिक उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेत, तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत, संस्था गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
सर्व समाजासाठी आदर्शः
गावातील शिक्षण, आरोग्य व सामाजिक प्रगतीसाठी समर्पित असलेल्या संस्थेने आजच्या दिवशी मुलांना शालेय साहित्य देऊन राष्ट्रीय सणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे. उपस्थित मान्यवरांचे योगदानः संस्थेचे अध्यक्ष रोहित संभाजी भोईटे उपाध्यक्ष, दत्तात्रय भुजंगराव भोईटे खजिनदार श्री. उमेश रामचंद्र भोईटे सचिव धनाजी भिकोबा कुंभार कायदेशीर सल्लागार एडवोकेट गणेश जगन्नाथ राऊत आणि संचालक मंडळातील प्रशांत गुलाबराव तावरे राहुल संभाजी भोईटे प्रतीक चंद्रकांत भोईटे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी समाजाला शिक्षण व सामाजिक प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या वेळी बोलताना सरपंच सौ. अमिता अशोक भोईटे यांनी लोकराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही वाघोली गावाच्या ओळखीचा आधार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाचा सर्वांगीण विकास होत असून भविष्यातही अशाच उपक्रमांसाठी संस्था प्रयत्नशील राहवी असे नमूद केले तर या उपक्रमासाठी लोकराज्य फाउंडेशनचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी आभार मानले व भविष्यात पण संस्थेकडून अशा प्रकारे उपक्रम राबवले जावेत अपेक्षा व्यक्त केली