फुले एज्युकेशन तर्फे शिवजयंती दिनी कळमनुरी येथे सत्यशोधक पद्धतीने 10 वा.गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.हिंगोली/कळमनुरी . फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने हिंगोली ,कळमनुरी येथे सत्यशोधक बालासाहेब भालेराव यांनी आपल्या आजीच्या नावाने असलेले “सरस्वती सदन “ चा वास्तू पूजन व गृहप्रवेश सोहळा कुळवाडी भूषण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंती निमित्त दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता सावित्रीबाई फुले ग्रंथ वाटप करीत सर्वांनकडून उद्देशिका वाचन करून घेतली.तसेच शिवरायांच्या मार्गावर चालत वसा घेऊन अंधश्रद्धेला बळी पडणार नाही अशी देखील सर्वाना शिव शपथ देण्यात आली. याप्रसंगी आईवडील सौ.लक्ष्मीबाई व राघोजी भालेराव यांनी फुले दांपत्य , समाजसेविका प्रयागबाई सातव छ.शिवाजी महाराज ,सुमनबाई दळवी छ.शाहू महाराज ,शंकुतला गाबने डॉ.आंबेडकर आणि सुवर्णरेखा व शरद दळवी यांचे हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला तर अनिता भालेराव यांचे हस्ते राष्ट्रीय संविधान व इतर ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी घरांसाठी ज्या मजुरांनी काम केले त्या मजुरांचा ,वायरमन बाळू गरड,पेंटर अशोक मगर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ,सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला..या सत्यशोधक पूजेसाठी विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत हे कार्य मोफत पार पाडले.तर यावेळी सत्यशोधक बालासाहेब भालेराव यांना भारताचे संविधान ग्रंथ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मान पत्र तसेच सौ.सीमा व भगवान भालेराव यांना फुले दाम्पत्य फोटो फ्रेम विधिकर्ते ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.
याप्रंसगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की छ. शिवाजी महाराज यांनी अंधश्रद्धा , कर्मकांड शुभवेळ दिवस याला फाटा देत सर्व लढाई जिंकले, किल्ले बांधले आणि रयतेचे स्वराज्य निर्माण केले त्या कुळवाडी भूषण महाराजाची समाधी महात्मा फुले यांनी 1869 ला प्रथम शोधून शिवजयंती सोहळा 10 दिवसाचा साजरा करून पहिला पोवाडा देखील लिहिला.आणि आज या हिंगोली परिसरात प्रथमच सत्यशोधक भालेराव परिवाराने शिवजयंती शुभ दिवस समजून वास्तू पूजन व गृहप्रवेश सोहळा पार पाडला हा आदर्श आपण सर्वांनी महापुरुषांचा वारसा, विचार,वसा पुढे घेऊन आपले घरातील सर्व विधीकार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावे असे देखील ढोक म्हणाले.
यावेळी प्रथमच सत्यशोधक कार्य घडत असल्याने परिसरातील मोठ्या संख्येने सर्व समाज तसेच तहसील कार्यालय, कळमनुरी मधील अब्दुल खालेक, अंनिस सय्यद, एस. एस. खिलारे, पंकज खैरकर व इतर अधिकारी व मित्र परिवार आवर्जून उपस्थित होते. या सत्यशोधक पूजेचे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
याप्रसंगी किनवटचे ज्येष्ठ कवी अशोक वसाटे यांची शिवजयंती चे जनक महात्मा फुले ही कविता आणि महात्मा फुले यांचा सत्याचा अखंड ने कार्यक्रमाची सांगता करून पान सुपारी वाटून सर्वांना सुग्रास भोजन देण्यात आले.हा सोहळा यशस्वी होणे कामी संध्या भालेराव, सुवर्ण रेखा दळवी, आणि अमोल भालेराव,शिवाजी नानवटे,यांनी मदत केली तर बाळासाहेब भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले.
फुले एज्युकेशन तर्फे शिवजयंती दिनी कळमनुरी येथे सत्यशोधक पद्धतीने 10 वा.गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला.
