*औंध मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध येथील ग्रामपंचायत समोरील चौका मध्ये औंधकरांनी मोठया उत्साहात शिव जयंती साजरी केली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची औंध गावातून शाही मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी औंध मधील सकल हिंदू समाज एकवटल्याचे दिसून आले.
औंध ग्रामपंचायत चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा ठेवण्यात आला होता.त्यास महालाची केलेली देखणी आरास पाहण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी दिवसभर औंध मधील शिवभक्तांनी गर्दी केली होती.
तसेच संध्याकाळी औंध मधून शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औंध मधील सकल हिंदू समाज तसेच औंध ग्रामस्थ,तरुण वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जय भवानी जय शिवाजी,जय श्रीराम या घोषणा देत मिरवणूक पार पाडली गेली.यामुळे औंध परिसर दुमदुमून गेला होता.