सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक च्या जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज गोडसे यांची निव
▪️ खासदार नितीन पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
प्रतिनिधी.विनोद लोहार
वडूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नाळ व विचारधारा खटाव तालुक्याशी जोडल्याने जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसपदी पृथ्वीराज गोडसे यांची झालेली निवड सार्थ ठरेल असा आत्मविश्वास खा . नितीन काका पाटील यांनी व्यक्त केला .
सातारा येयील राष्ट्रवादी पाटी कार्यालयात नूतन पदाधिकारी व सभासद नोंदणी कार्यक्रमात पाटील बोलत होते . यावेळी आमदार सचीन पाटील , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर , ॲड रणजीत माने,जेष्ठ नेते शिवाजीराव गोडसे , व राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती ..
खासदार पाटील पुढे म्हणाले की , जिल्ह्यात महायुतीचे आठ आमदार प्रचंड मताधिक्यात निवडून आले तर चार कॅबिनेट मंत्री झाले . यामुळे सर्व सामान्य लोकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत . नागरीकांच्या दैनदिन समस्या बरोबरीने गावागावात ठोस विकास कामे करण्यासाठी पक्षाची सभासद नोंदणी आवश्यक आहे. लवकरच उर्वरीत पदाधिकारी नियुक्ती व गावोगावी सभासद नोंदणी अभियान राबविणार असल्याचे सुतोवाच खासदार पाटील यांनी यावेळी केले .
नूतन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले की तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात राष्ट्रवादी पक्षाला माननारा गट कार्यरत आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासकीय कार्य पद्धती आणि विविध कामांचा निपटारा याची जाण खटाव तालुक्याला आहे. पक्ष श्रेष्ठी व दादांनी दिलेली जबाबदारी प्रामाणीक पणे पार पाडून सभासद नोंदणी ही जोमाने करणार आहे . पक्षाची विचारधारा तळा गळा पर्यंत पोहचवून पदाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय देणार असल्याचे सूतोवाच जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी केले .
याप्रंसगी डॉ . संतोष गोडसे , डॉ. रोहन गोडसे ,अँड संतोष भोसले , साहेबराव गोडसे , कुबेर गोडसे , राजेंद्र माने ,धनाजी दुबळे , प्रसाद बागल , अँड . प्रल्हाद सावंत , प्रा .दिलीपराव डोईफोडे , राहुल सजगणे , इम्तियाज बागवान आदी सह खटाव तालुक्यातील पृथ्वीराज गोडसे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
फोटो .
राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज गोडसे यांना नियुक्ती पत्र देताना खा . नितीन पाटील , शेजारी आ. सचीन पाटील , बाळासाहेब सोळस्कर व इतर
सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक च्या जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज गोडसे यांची निवड
