आधुनिक युगातील श्रावणबाळ

आधुनिक युगातील श्रावणबाळ

विशेष वृत्त…

वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करणारा आधुनिक श्रावण….

अभय धोंडीराम वाघमारे यांनी
माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे माजी आमदार धोंडीराम दादा वाघमारे यांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त नुकतेच वडजल तालुका माण येथे भव्य कवी संमेलन आयोजित केले होते.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल वाघ होते.
अत्यंत सुंदर पहाडी आवाजातील त्यांच्या कविता ऐकण्याचा योग आला.
माण तालुक्यातील आमदार धोंडीराम वाघमारे यांनी माण तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे यासाठी आपलं आयुष्य घालवले, मंत्री पद ही नाकारलं होते..
..
माण तालुक्यात माजी आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांनी १९९५ सालात साहित्य संमेलन आयोजित केले होते.

त्यांचे चिरंजीव अभय वाघमारे यांनी आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

साहित्यिक व कवी मनाचे, जननायक असणारे माण तालुक्याचे सामान्य माणसाचा आधार असणारे लोकप्रतिनिधी, जलनायक , गरीबांचा देव…
म्हणून ज्यांचे नाव आजही घेतलं जातं ते ..
माजी आमदार स्व.धोंडीराम दादा वाघमारे..
यांचं स्मारक चिरंजीव अभय वाघमारे यांनी वडजल तालुका माण येथे सुंदर स्मारक उभारले आहे.
ते पाहण्याचा योग आला .
आज संगणक युगात माणूस माणूसकी हरवत चालला आहे..
आज समाजात वावरताना आपणास बिघडलेली तरुणाई सगळीकडे दिसते..
दिवसेंदिवस तरुणाई व्यसनाधीन होत आहे.. संस्कृती नष्ट होईल अशी भीतीही निर्माण झाली आहे.
कारण समाजात सुसंस्कृत विचार आणि आदर्श व्यक्ती चा अभाव आहे…
समाजामध्ये आदर्श घ्यावा अशी माणसे दिसतं नाहीत.

विंदा करंदीकर म्हणतात..
“” साऱ्याच ज्योती विझू विझू झाल्या.
झेप घेऊन पंतगाने प्राण आपले द्यावेत…
असं तेज कुठेच उरले नाही….””
आज आदर्शवत व्यक्ती च दिसत नाही..
हे दुर्दैव आहे.. पण ते खरं आहे..

सगळीकडे भ्रष्टाचार व बेईमान लोक खचून भरलेलेली दिसतात. सत्तेत ही सगळी कडे समाजातील नीती मुल्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना सन्मान मिळतो आहे…
हे पण समाजाचं दुर्दैवच आहे…
.. समाज एका टोकाच्या वळणावर जात आहे…
दारू,अमंली पदार्थ सेवन करणारी मोठ्या आई वडीलांची बिघडलेली मुलं पाहून मन उद्विग्न होऊन जातं.
पण आजच्या काळात सुद्धा काही आदर्श मुलं पाहताना
आनंद नक्कीच वाटतो..

साऱ्याच ज्योती, विझू विझू झाल्या,
झडप घालून पंतगाने प्राण
आपले द्यावे त असं तेच
कुठच उरलं नाही..
ही वि.दा.करंदीकराची कविता…
खुप. काही सांगून जाते..

आजच्या काळात आदर्श घ्यावा अशी माणसे दिसतं नाहीत..कुणाचा आदर्श घ्यावा.. अशी अवस्था झाली आहे..
पण…..
अपवाद हा प्रत्येक गोष्टीत असतो…
आजही आपल्या वडिलांच्या आठवणी जीवंत ठेवण्यासाठी जीवाचं रान करणारा…
एक आदर्श….
श्रावण बाळ..
आपल्या माण तालुक्यात आहे..
…तो म्हणजे..
अभय धोंडीराम वाघमारे.. हा तरुण…..
मुंबई येथे वाढलेला हा तरुण….
आपल्या वडीलांच्या प्रतिष्ठेला अधिक प्रकाशमान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत घेतो आहे. वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी कवी संमेलन घेतोय
त्याचं काम समाजाला नवी दिशा देणारे आहे.,
.. तरुणांना खुप प्रेरणादायी गोष्ट आहे …

मुंबई या मायावी नगरीत बालपण गेले.
मात्र माण तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना आजही हा तरुण विसरलेला नाही..
माण तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या अडाणी व प्रेमळ लोकांची जवळीक निर्माण करुन येथील मातीचे ऋण फेडण्यासाठी तळमळीने काम करीत आहे..
त्यांची ही तळमळ फक्त आपल्या वडीलांच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी आहे..
मी आणि माझा बाप
ही कांदबरी लिहिणारे नरेंद्र जाधव…
सगळ्यांना माहीत आहेत.

रानामाळात असणाऱ्या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी धडपडणारे माजी आमदार धोंडीराम वाघमारे समजून घेण्यासाठी स्मारकाच्या निमित्ताने विविध लोकांना भेटला..
आपल्या वडीलांच्या कार्याची माहिती घेतली..
त्यांनी लिहिलेला दुष्काळ व जनजीवन या विषयावर लिहलेला “हुंदका ” हा कवितासंग्रह पुन्हा प्रकाशित केला..
असा तरुण समाजात पाह्यला मिळत नाही…

या एका आदर्श मुलांचं कार्य आजच्या काळात तरुणांना प्रेरणा देणारे आहे.
धोंडीराम वाघमारे यांच्या सारखी
जग बदलणारी माणसं जन्माला येतात..
आणि आपल्या आठवणी सोडून जातात..
….

शब्दांकन -विजय टाकणे….
जेष्ठ पत्रकार..९९२१४९४९९८.
….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *