मुरूम, ता. उमरगा, ता. २९ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवारी (ता. २८) रोजी पार पडला. या पंधरवड्यामध्ये महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमाद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी म्हणून खुले ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी आवडेल त्या विद्यार्थ्यांना ग्रंथ व पुस्तके दिल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. राम बजगिरे, डॉ. सुजित मटकरी, डॉ. सायबण्णा घोडके यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाविद्यालयातील पदवी-पदव्युत्तर विभागातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतून कुमारी
वैष्णवी ख्याडे (बी. एस्सी. प्रथम) प्रथम, सुप्रिया बनसोडे (बी. ए. प्रथम) द्वितीय, उमा पुजारी (बी. कॉम.) तृतीय तर पदव्युत्तर विभागातून प्रियंका मुंडासे (एम. ए. भाग २ राज्यशास्त्र) प्रथम, प्रीती मुंडासे, द्वितीय, आरती कांबळे व दिव्या सूर्यवंशी (एम. ए. भाग १ राज्यशास्त्र), अजिंक्य राठोड, उत्तेजनार्थ, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी प्रीती माळकुंजे (प्रथम), सुरज साठे (द्वितीय), आजी पवार (तृतीय) तर प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयातून वर्षाराणी घोडके (प्रथम), प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमधून पूर्वा राठोड (प्रथम), साक्षी धानोरे (द्वितीय), श्रुती श्रीरसागर (तृतीय) आदींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजकुमार देवशेट्टे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुशिल मठपती यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत बक्षीस वितरण करताना मान्यवर व विजेते स्पर्धक.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत विविध स्पर्धेतील स्पर्धकांना प्रशस्तीपत्राचे वाटप
