औंधच्या सरपंच तर उपसरपंच यांचा सुखदेव इंगळे तर अमोल इंगळे कुटुंबीयांकडून नागरी सत्कार
औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
औंध : औंध मधील सुखदेव इंगळे, अमोल इंगळे या इंगळे कुटुंबीयांनी औंधच्या माजी सरपंच सौ सोनाली मिठारी तर माजी उपसरपंच दीपक नलवडे तसेच वॉर्ड मधील माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी राव इंगळे यांच्या कामाची दखल घेत नागरी सत्कार केला आहे.
खरे तर राजकीय जीवनात ही लोक जेनतेचे सेवा करत असतात. खऱ्या अर्थाने कुणी तरी केल्याला कामाचे कौतुक करावे एवढीच माफक अपेक्षा असते. यावेळी मात्र श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे एक निष्ठ सुखदेव इंगळे यांचे घर यांनी एक अनोखा सत्कार घेण्याची ठरवले यावेळी एकाच कुटुंबातील 40 सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी सरपंच सौ सोनाली मिठारी यांचा सत्कार इंगळे कुटुंबातील महिलांनी घेतला तर उपसरपंच दीपक नलवडे यांचा सत्कार तसेच ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव इंगळे यांचा सत्कार इंगळे कुटुंबातील पुरुष सदस्यांनी घेतला.
यावेळी बोलताना उपसरपंच दीपकजी नलवडे बोलले माजा राजकरणाच्या आयुष्यात प्रथम असा सत्कार होत असल्याने अतिशय आनंद होत आहे.खरे मी राजाकराणा पासून सेवा निवृत्त होण्याचा विचार करणार होतो परंतु इंगळे कुटुंबीयांच्या या आपुलकीच्या सन्मानाने पुन्हा एखादा जनतेची सेवा करावी आशी इच्छा प्रकट होत आहे.
ग्राम सदस्य तानाजी राव इंगळे कुटूंबातील मुलांना हे माज हक्काचं घर असून तरुण मुलांनी शिक्षणाकडे वळावे. असा संदेश दिला. सरपंच सोनाली मिठारी यांनी बोलताना भावुक होत इंगळे कुटूंबियांचे आभार मानले.तर इंगळे कुटूंबीयांच्या विनंतीस माण देऊन आपण आला या बद्दल ओंकार इंगळे तर धीरज इंगळे, केदार इंगळे, शिवम इंगळे, अनिकेत भोसले, चैतन्य इंगळे, सुशांत इंगळे नंदकुमार इंगळे, रतन इंगळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.