दिलीप वाघमारे )
ठेकेदारांच्या सांगण्यावरून न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची घटना पुणे येथील काळे पडळ
येथील पोलिस ठाण्यात घटली होती.
सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
30 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या तकारदारास ठाणे अंमलदार व अन्य तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करून न घेता उलट पक्षी ठेकेदाराच्या सांगण्यावरून त्यास अमानुष मारहाण केल्याची घटना दि. 30 डिसेंबर 2024 रोजी रात्र साडेनऊ वाजता यापूर्वी काळेपडळ तरवडी वस्ती पोलीस ठाण्यात घडली होती.
त्याप्रकरणी तक्रारदाराने न्यायालयाचा आधार घेऊन वरील प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी तीव्र लढा दिला होता .
त्यानंतर एक महिन्याच्या आतच याची चौकशी साठी न्यायालयाच्या आदेशाने 27 जानेवारी रोजी 2025 रोजी पुणे कार्यक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या कडे तपासाची सूत्रे अधिकृत देण्यात आली त्यानुसार तक्रारदार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन
आज जवाब घेण्यात आले.
अंमलदार प्रमोद पाटील व तीन पोलीस तसेच ठेकेदार आणि साथीदार यांची चौकशी सुरू आहे.
पुढील तपासासाठी पुढील दोन दिवसात पूर्ण होऊन न्यायालयीन प्रक्रिया संपन्न होईल संबंधित पोलिसांवर कारवाई होऊन तक्रारदार यांना न्याय मिळेल.